संगमनेर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; पिंपरणे शिवारात डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

0
69

संगमनेर : तालुक्यात शेतकरी व शेतमजुरांवरील बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच पिंपरणे शिवारातील राहिंज वस्ती येथे बिबट्याने डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर झडप घालून गंभीर जखमी केले. अनिता रमेश वाकचौरे (वय ३८) असे जखमी महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिता वाकचौरे आपल्या पतीसमवेत शेतात डाळिंब तोडत होत्या. दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या पाठीमागून अचानक हल्ला केला. या झडपीत त्यांच्या गालावर व हातावर खोलवर जखमा झाल्या. त्यांच्या आरडाओरडीनंतर पती रमेश वाकचौरे यांनी धावत जाऊन बिबट्याला पळवून लावले. तत्काळ त्यांना संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक राकेश कोळी, दौलत पठाण, ओंकार गोर्डे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. यापूर्वी शेडगाव येथे एका बालकावर, तर रायतेवाडी येथे १७ वर्षीय मुलावर हल्ला झाला होता. आठवडाभरात घडलेल्या तिन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here