राहुल खताळ यांच्या सूचनेनंतर वीजपुरवठा सुरळीत

0
173

वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळताच राहुल खताळ यांनी घटनास्थळी घेतली तात्काळ धाव.

संगमनेर: काल (दि.२५ मे) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे संगमनेर खुर्द परिसरात विजेच्या तारांवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. या कारणामुळे सकाळपासून २० ते २५ टँकर थांबलेले होते आणि शहरातील व तालुक्यातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

घटनेची माहिती मिळताच मा. राहुल खताळ यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे काही वेळातच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आणि टँकरमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.

राहुल खताळ यांच्या या तत्परतेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून त्यांच्या जलद निर्णयक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here