ग्रामीण तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन देणार – आमदार अमोल खताळ

0
137

जांभुळवाडी फाटा येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न

संगमनेर : ग्रामीण भागातील तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आपली कला दाखविण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असून, या दिशेने सतत काम सुरू राहील, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी फाटा येथे सुरू झालेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला. या वेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार खताळ म्हणाले, “पूर्वी या भागाला दुष्काळी म्हणून ओळखले जायचे, मात्र आता या भागात पाण्याची उपलब्धता झाली असून, मोठ्या क्रिकेट स्पर्धाही आयोजित होत आहेत. या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील तरुणांना संधी मिळत आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे.”

यावेळी कवठेकमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे, तळेगावचे माजी सरपंच मयूर दिघे, कासारेचे सरपंच महेश बो-हाडे, तसेच आमदार खताळ समर्थक नवनाथ कानकाटे, सचिन जोंधळे, योगेश जोंधळे, गणेश वराडे, अमित सुपेकर, अशोक गाढे, गोरख नाईक, सोमनाथ शेळके, शामराव नाईक, पो.पा. वाल्मीक गाडे पाटील, मयूर कार्ले, सुयोग कार्ले, दत्तात्रय कार्ले, रमेश कानकाटे, गोरख गांडुळे, संजय लाहामगे, दत्तात्रय गाडे, भागवत गायकवाड, एकनाथ गाडे, दत्तात्रय सोनवणे, नंदकुमार मोरे, मेजर अक्षय कार्ले, अक्षय आरणे, पत्रकार रामनाथ बो-हाडे, भीमा कार्ले, संजय जोंधळे, आदिल आणि परिसरातील अनेक मान्यवर व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जांभुळवाडी फाटा येथे सुरू असलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत आमदार अमोल खताळ यांनी हातात बॅट घेत मैदानात उतरून दमदार फलंदाजी करत चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्यांच्या या फटकेबाजीनं उपस्थित प्रेक्षकांची टाळ्यांची दाद मिळवली असून, ही फटकेबाजी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here