संगमनेर तालुक्यात आज निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन

0
67

संगमनेर : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी व पालखी सोहळा नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीवरील संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुक येथे आगमन होणार आहे.

विठूनामाच्या गजर, भगवे झेंडे, डोईवर तुळस घेऊन महिला भाविक तर गळ्यात टाळ घालून पुरुष भाविक-भक्त हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. सर्वच भाविक-भक्त विठ्ठल नामाच्या जयजयकारात तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत.

पारेगाव बुद्रूक ग्रामस्थांकडून पालखी सोहळ्याचे फुलांची उधळण करत उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून १० जून रोजी श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे.

अशी होणार पालखी मार्गस्थ

नाशिक-पंचवटी-मुक्तिधाम(नाशिक रोड) पळसे-लोणारवाडी खंबाळे-पारेगाव-गोगलगाव-राजुरी-बेलापूर-राहुरी-डोंगरगण-अहमदनगर-साकत-घोगरगाव-मिरज गाव-चिंचोली कर्जत-कोरेगाव-राबगाव-जेऊर-कंदर-दगडी अकोले-करकंब-पांढरीवाडी चिंचोली-पंढरपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here