संगमनेर : शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय भवनात प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत प्रक्रीया पार पडली. यामध्ये २०२५ ते २०३० या कालावधीसाठी संगमनेर तालुक्यातील एकूण १४४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीनुसार तब्बल ७३ ग्रामपंचायतींचे नेतृत्व महिलांच्या हाती जाणार आहे.
या निर्णयामुळे तालुक्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ झाली आहे. इच्छूक उमेदवारांमध्ये चांगलीच धांदल उडाली असून, अनेक ठिकाणी इच्छुकांना आपल्या कुटुंबातील महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करावी लागणार आहे. गावोगावी इच्छुक महिला उमेदवारांची चाचपणी सुरु झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीला रंगत चढू लागली आहे.
या आरक्षण सोडतीनंतर अनेक गावांमध्ये राजकीय चर्चांना जोर आला असून, पुढील काही दिवसांत उमेदवारी जाहीर करण्याची चुरस वाढण्याची शक्यता आहे. तसेच गावोगावी नवी राजकीय समीकरणे आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तालुक्यात महिलांच्या नेतृत्वाला यामुळे प्रोत्साहन मिळेल, तसेच ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आरक्षण सोडत पुढील प्रमाणे-
अनुसूचित जाती प्रवर्ग (स्त्री) : खांबे, डिग्रस, अंभोरे, निमगाव खुर्द, गुंजाळवाडी, सांगवी
अनुसूचित जाती प्रवर्ग : ओझर बुद्रुक, पिंपळगाव कोंझिरा, राजापूर, धांदरफळ बुद्रुक, देवगाव
अनुसूचित जमाती प्रवर्गात शिंदोडी स्त्री, चणेगाव स्त्री, उंबरी, लोहारे स्त्री, खरशिंदे स्त्री, मिर्झापूर, संगमनेर खुर्द स्त्री, औरंगपूर, सावरगाव तळ स्त्री, नान्नज दुमाला, पिंपळे, सोनोशी स्त्री, वरवंडी, तिगाव स्त्री, कोकणगाव स्त्री, सावरगाव घुले, धांदरफळ खुर्द, जाखुरी स्त्री, ढोलेवाडी स्त्री, निमगाव जाळी, खळी, कोल्हेवाडी, मनोली स्त्री, मालुंजे या गावांचा समावेश आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गात शिरसगाव स्त्री, जवळे बाळेश्वर स्त्री, सावरचोळ, शेंडेवाडी, कुरकुंडी स्त्री, पिंपळगाव माथा, हिवरगाव पठार स्त्री, महालवाडी, जांबुत बुद्रुक, खंदरमाळवाडी स्त्री, कर्जुले पठार, सारोळे पठार, पोखरी बाळेश्वर स्त्री, झरेकाठी स्त्री, बोरबनवाडी स्त्री, प्रतापपूर स्त्री, जोर्वे, पिंपरणे स्त्री, चिकणी, समनापूर स्त्री, आश्वी खुर्द, पारेगाव खुर्द, आश्वी बुद्रुक स्त्री, ओझर खुर्द, निमज स्त्री, कनोली स्त्री, घुलेवाडी, कासारे स्त्री, वेल्हाळे, माळेगाव हवेली स्त्री, वडगाव पान स्त्री, काकडवाडी, देवकौठे स्त्री, करुले स्त्री, जांभुळवाडी, वडझरी बुद्रुक, बिरेवाडी, निमगाव टेंभी स्त्री, शिरापूर या गावांचा समावेश आहे.
सर्वसाधारण प्रवर्गात कोळवाडे, भोजदरी स्त्री, अकलापूर, कौठे मलकापूर स्त्री, म्हसवंडी, डोळासणे, कौठे बुद्रुक स्त्री, कोंची, वनकुटे स्त्री, माळेगाव पठार स्त्री, घारगाव स्त्री, बोटा स्त्री, कनकापूर स्त्री, नांदूर खंदरमाळ स्त्री, कुरकुटवाडी स्त्री, आंबीखालसा, खराडी स्त्री, रणखांबवाडी, साकूर स्त्री, नांदुरी दुमाला स्त्री, मांडवे बुद्रुक, सादतपूर स्त्री, हंगेवाडी स्त्री, आंबीदुमाला स्त्री, पिंपळगाव देपा, कासारा दुमाला स्त्री, रहिमपूर, पानोडी स्त्री, रायते स्त्री, पळसखेडे स्त्री, पेमगिरी, चिंचोली गुरव,
चिंचपूर बुद्रुक, सोनेवाडी स्त्री, मिरपूर, शेडगाव स्त्री, जवळे कडलग, वडगाव लांडगा स्त्री, दरेवाडी स्त्री, साखखिंडी, चंदनापुरी, कौठे कमळेश्वर, चिखली, कौठे खुर्द, पोखरी हवेली स्त्री, मेंढवण, वडझरी खुर्द स्त्री, कुरण स्त्री, सुकेवाडी, मंगळापूर, निमगाव बुद्रुक स्त्री, रायतेवाडी स्त्री, निमोण स्त्री, कौठे धांदरफळ स्त्री, शिबलापूर, पारेगाव बुद्रुक स्त्री, हिवरगाव पावसा, दाढ खुर्द, वरुडी पठार, वाघापूर, कऱ्हे, मालदाड स्त्री, तळेगाव, निमगाव भोजापूर, निंभाळे, निळवंडे, पिंप्री – लौकी अजमपूर, खांडगाव स्त्री, खांजापूर स्त्री, झोळे या गावांचा समावेश आहे.








