संगमनेरात अवैध मटका अड्ड्यांवर छापे; ३५ जणांना अटक, १०.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
44

संगमनेर : संगमनेर शहरात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने तीन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकत मोठी धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत तब्बल १० लाख ३५ हजार ३४७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ३५ आरोपींना अटक करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे ही कारवाई शहर पोलीस ठाणे आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी झाली. त्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संगमनेरमध्ये अवैध मटका, जुगार, दारू आणि वाळूचे धंदे सर्रासपणे सुरू असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

ही कारवाई २० जून २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास संगमनेर शहरातील तेलीखुंट व कोल्हेवाडी रोड परिसरातील मटक्याच्या अड्ड्यांवर करण्यात आली. पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही धाड टाकली.

या कारवाईमुळे संगमनेरात खळबळ उडाली आहे. अवघ्या काही अंतरावर असलेल्या पोलीस यंत्रणेला ही माहिती नसणे, की त्यांनी याकडे दुर्लक्ष केले का, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. मात्र आता यानिमित्ताने पोलीस प्रशासनाकडून भविष्यात आणखी मोठ्या कारवायांचा इशारा दिला गेला आहे. संगमनेरमधील बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आता प्रभावी वचक ठेवून त्यांचा कायमचा बंदोबस्त करणे पोलिस यंत्रणेपुढील मोठे आव्हान आहे. हे आव्हान ते कसे हाताळतात आणि संगमनेरमधील अवैध धंद्यांचे जाळे कमी कसे करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here