संगमनेर : आगामी संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भावी नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार असून त्यासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेर नगरपालिकेवर खुल्या प्रवर्गातील महिला नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज (सोमवार) मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला.
अनेक दिवसांपासून आपल्या नगरपालिकेचं आरक्षण काय ठरणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली होती, अखेर आज उत्तर मिळालं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तूळात खुल्या प्रवर्गातील महिलांच्या नावाची चाचपणी आणि चर्चा सुरू झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता राजकीय हालचालींना शहरात वेग आला आहे.
आरक्षण सोडतीकडे संपूर्ण संगमनेरकरांचे तसेच इच्छुक उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांच्या धुरिणांचे लक्ष लागले होते. आजच्या आरक्षण सोडतीनंतर आता निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे. आता खुल्या प्रवर्गातील इच्छुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.








