रामेश्वर आणि निझर्नेश्वर महादेवाचे आमदार अमोल खताळ यांनी सपत्नीक घेतले दर्शन.
संगमनेर, दि. २६ फेब्रुवारी : महाशिवरात्री निमित्त संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु. येथील जागृत देवस्थान श्री रामेश्वर महादेव व कोकणगाव येथील निझर्नेश्वर महादेव मंदिरात आमदार अमोल खताळ व पत्नी सौ. निलम खताळ यांनी आज महाशिवरात्री निमित्त दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते महाअभिषेक व महाआरती संपन्न झाली.
यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, “भगवान शंकराच्या चरणी तालुक्यातील सर्व जनतेला सुख-समृद्धी लाभो, शेतीला भरभराटी येऊ दे, आणि माझ्या हातून जनसेवा घडू दे,” अशी प्रार्थना केली. संगमनेर तालुक्यातील रामेश्वर, खांडेश्वर, निझर्नेश्वर आणि बाळेश्वर ही शिवमंदिरे जागृत देवस्थान असून, शिवभक्त म्हणून मी नेहमीच या स्थानी दर्शनासाठी येत असतो. यंदा लोकप्रतिनिधी म्हणून या पवित्र स्थळी महाशिवरात्रीला उपस्थित राहण्याचा योग लाभला, असेही त्यांनी नमूद केले.
रामेश्वर मंदिरातील दर्शनावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासोबत कमलेश डेरे, गोकुळ देशमुख, पुंजा डेरे, अक्षय कोल्हे, राहुल शेटे, हरीश वलवे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, निझर्नेश्वर मंदिरात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ जोंधळे, विश्वस्त गंगाधर वायकर, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, गुरु सुनील कुलकर्णी आणि देवस्थानचे पुजारी यांच्या समवेत अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.








