अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करा ; आढावा बैठकीत आ. खताळांच्या अधिकाऱ्यांना सूचना

0
131

संगमनेर : तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहे.

संगमनेर शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपाधिक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह घारगाव व आश्वी येथील पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यात अवैध व्यवसाय जोरदार सुरू असल्याने आमदार खताळ यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. संगमनेर शहरामध्ये बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने याचा परिणाम शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या

सध्या संगमनेर शहरात चोरीच्या घटना वाढत आहे. महिलांचे दागिने चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या चोरांचा तपास का लागत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे तपास शाखेचे दोन भाग करावे. त्यामुळे चोरांचा तपास लावणे पोलिसांना शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.


तालुक्यात आपण कोणताही अवैध व्यवसाय खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी या बैठकीत बोलताना दिला. यावेळी पोलीस उपाधिक्षक कुणाल सोनवणे यांनी पोलिसांकडून होत असलेल्या उपाय योजनांबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here