पाकिस्तानी झेंडा जाळून संगमनेरात निषेध

0
62

संगमनेर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून एकएकाला ठार केले. या भ्याड हल्ल्याचा संगमनेर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोर जुन्या नाशिक पुणे महामार्गावर उतरत जोरदार घोषणाबाजी करून या हल्ल्याचा जाहीर शब्दामध्ये निषेध केला.

पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा देत संतप्त झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या हिरव्या झेंड्याचे दहन करत संताप व्यक्त केला. यावेळी महायुतीच्या वतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, रमेश काळे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, शहराध्यक्ष पायल ताजणे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, भाजपचे माजी नगरसेवक शिरीष मुळे, ज्ञानेश्-वर कर्पे, सुदर्श नइटप, दिलीप कोल्हे, भारत गवळी, शशांक नामन, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हिंदू पर्यटकांवर दहशत वाद्यांनी जो हल्ला केला आहे, त्या सर्वच अतिरेकी संघटना खत्म करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलावे.
पायल ताजणे, शहराध्यक्ष भाजपा

दहशतवाद्यांनी जो हल्ला केला. तो हल्ला फक्त हिंदू पर्यटकांवर झालेला नाही. तर संपूर्ण देशातील असंख्य हिंदूंवर झालेला हल्ला आहे, त्यामुळे खून का बदला, खून से देंगे असे करून त्यांचा बदला घेतला पाहिजे.

– विनोद सूर्यवंशी, शहरप्रमुख शिवसेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here