आ. अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश : संगमनेरसह महाराष्ट्रातील घरमालकांना मोठा दिलासा!

0
58

संगमनेर – संगमनेर शहर आणि राज्यभरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्वसामान्य घरमालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय अखेर घेण्यात आला आहे.

आमदार अमोल खताळ यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे वारंवार मांडलेल्या मागणीला यश आलं आहे. त्यांच्या सहकार्यामुळे आणि सकारात्मक दृष्टीकोनामुळे, नगरपरिषद हद्दीतील शास्तीकर व त्यावर लावण्यात आलेली दंडाची रक्कम पूर्णतः माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

संपूर्ण राज्यात “अभय योजना” लागू करण्यात येणार असून, जुने थकबाकीदार नागरिक आता दंडाच्या भीतीशिवाय आपल्या घरावरचा हक्क प्रस्थापित करू शकणार आहेत.

हा निर्णय म्हणजे फक्त करमाफी नाही, तर कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना दिलासा देणारं एक सामाजिक उत्तरदायित्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शास्तीकराच्या नावाखाली सामान्य माणसांवर अन्याय होत होता – आता तो अन्याय दूर होणार आहे.

संगमनेर शहरातील नागरिकांना त्यांच्या हक्काचं घर कोणत्याही अडथळ्याशिवाय, निश्चित भावनेने मिळावं,अशी ठाम भूमिका आमदार खताळ यांची होती आणि आहे.

महायुती सरकारचे, विशेषतः मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आ. खताळ यांनी मनःपूर्वक आभार मानले.
हा निर्णय म्हणजे फक्त एक शासन आदेश नाही, तर हजारो घरांमागे असलेल्या कहाण्यांना, संघर्षांना आणि स्वप्नांना न्याय देणारे एक पाऊल आहे.

– अमोल खताळ पाटील
आमदार, संगमनेर विधानसभा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here