धांदरफळ बु. : शहीद दिनाचे औचित्य साधून शिवशंभो हॉस्पिटल, निमा संघटना, जनसेवा फाऊंडेशन, भाजपा वैद्यकीय आघाडी, शिवशंभो परिवार, महायुती आणि अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार अमोल खताळ यांची होती. त्यांनी शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करून समाजासाठी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. या भव्य रक्तदान शिबिराला भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेना तालुकाध्यक्ष रमेश काळे दादाभाऊ गुंजाळ, बंडू नाना देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्र माचे यशस्वी आयोजन निमा अध्यक्ष डॉ. अमोल वालझाडे, डॉ. विकास करंजेकर, डॉ. सागर फापाळे, डॉ. शरद गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये राजेंद्र देशमुख, अविनाश वलवे, भारत नाइकवडी, लक्ष्मण काळे, किरण तोरकडे, शरद कवडे, राहुल शेटे, प्रदीप डेरे, पुंजा डेरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शहीद दिनानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. रक्तदान हेच सर्वात मोठे दान असून, समाजातील गरजू रुग्णांना याचा लाभ होणार आहे. अर्पण ब्लड बँकेच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेले रक्त योग्य गरजूंना उपलब्ध करून दिले जाईल.
या वेळी बोलताना आमदार अमोलभाऊ खताळ पाटील म्हणाले, रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. समाजातील प्रत्येक नागरिकाने या पवित्र कार्यात सहभागी व्हावे. शहीद दिनानिमित्त रक्तदान करून आपण खर्या अर्थाने देशभक्तांना अभिवादन करतो. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवर, डॉक्टर, संयोजक आणि सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले. भविष्यातही असे विधायक उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही आयोजकांना दिली.








