देवगड देवस्थानसाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. खताळ

0
126

आमदार अमोल खताळांनी सपत्नीक केली महाआरती

संगमनेर / प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे येत्या काळात या देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. देवस्थानाच्या विकासासाठी भविष्यात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड येथील खंडोबा महाराज यात्रोत्सवनिमित्त आमदार खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते खंडोबा मल्हार मार्तंडाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग व अश्वारूढ संघटना, हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अश्व व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खंडोबा देवगड देवस्थानपासून अश्वप्रदर्शनापर्यंत निघालेल्या मिरवणुकीतील रथाचे आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी सारथ्य केले.

आ. खताळ म्हणाले की, देवगड येथे यात्रोत्सवानिमित्त येणाऱ्या खंडोबा भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून पुलाचाही प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. या कामांसाठी निधी उपलब्ध करून देताना कुठेही हात आखडता घेतलेला नाही.

या यात्रोत्सवनिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अश्वप्रदर्शन आयोजित करण्यात आले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या अश्वप्रदर्शनात विविध जातीचे अश्व सहभागी झाले आहेत. देवस्थानाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच या परिसरातील बहुतांश विकासकामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मधल्या काळात नागरिकांनी मांडलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुद्धा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मार्गी लावला जाणार आहे या खंडोबा देवस्थान च्या माध्यमातून पर्यटनवाढ कशी होईल यासाठीही विशेष प्रयत्न केल जातील, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्री. काशिनाथ पावसे, देवगड अश्व सेवा संस्थेचे अध्यक्ष . उत्तम जाधव, हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सौ.सुजाता दवंगे यांच्यासह भाऊसाहेब जाधव, केशव दवंगे, गणेश दवंगे, सोमनाथ भालेराव, सुधीर शेळके, मकरंद मुळे, मथाजी पावसे, नारायण पावसे, बाबुराव पावसे, कैलास दिवटे, गणपत पावसे गोरख पावसे, गणेश पावसे, नवनाथ पावसे,सोमनाथ दवंगे, मच्छिंद्र गडाख, मंडू गडाख, चंद्रशेखर गडाख, कैलास गडाख, सुरेश पावसे, रावसाहेब जाधव, प्रकाश पावसे, दीपक भालेराव, लहानु भालेराव, बाळू भालेराव, विनोद सूर्यवंशी, श्याम राहाणे, अण्णा साहेब काळे, सुधाकर शिंदे,विशाल वर्पे,सचिन शिंदे , देविदास कदम, नंदकिशोर शिंदे,यांच्यासह इतर मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ यांनी केले रथाचे सारथ्य
संगमनेर तालुक्यातील प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र देवगड येथे खंडोबा महाराजांची महाआरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. महाआरतीनंतर यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अश्व प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाकडे जात असताना ग्रामस्थांनी आमदार खताळ यांना रथात बसण्याची विनंती केली. ग्रामस्थांची विनंती मान्य करत आमदार अमोल खताळ यांनी रथात बसून प्रत्यक्ष त्या रथाचे सारथ्य केले. यावेळी खंडोबा महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here