संगमनेर आगारात शिवनेरी थांबणार; प्रवाशांची गैरसोय दूर – आमदार खताळ

0
234

संगमनेर आगारात शिवनेरी थांबा देण्याबाबत परिवहन मंत्र्यांचे निर्देश

अनेक वर्षापासून पुणे-नाशिक येथून येणाऱ्या प्रवाशांची होणारी पायपीट थांबणार आहे. आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यानुसार संगमनेर आगारात शिवनेरी आणि विनावाहक बसथांब्याबाबत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत.

संगमनेरमधील अनेक प्रवासी नोकरी शिक्षण आणि वैद्यकीय कामासाठी पुणे-नाशिक या मोठ्या शहरात जा-ये करत असतात. मात्र शिवनेरी व विना वाहक बसगाड्या संगमनेर शहरात न येता बाह्यवळण मार्गाने जात असल्यामुळे संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या बाहेरच उतरावे लागत होते. या गंभीर समस्येबाबत आ. अमोल खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी निवेदन देऊन या प्रमुख मागणीकडे परिवहन मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले.

परिवहन मंत्र्यांनी आमदार खताळ यांच्या मागणीची गंभीर दखल घेत तसेच प्रवासी वर्गाचे होणारे हाल लक्षात घेऊन शिवनेरी आणि विना वाहक बसला संगमनेर आगारात थांबा देण्याबाबतच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होऊन पुणे-नाशिक मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या तातडीच्या निर्णया बद्दल आ. खताळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here