धार्मिक कार्यातूनच काम करण्यास ऊर्जा मिळते – आ. अमोल खताळ

0
32

संगमनेर : सर्वसामान्य जनतेची कामे करायला खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळत असते ती ऊर्जा प्रत्येक गावागावामध्ये होणारे अखंड हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव यांसारख्या धार्मिक कार्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळत असल्याचे गौरवोद्गार आ. अमोल खताळ यांनी काढले. संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आभिजीत महाराज गिरी यांच्या वाणीतून नवनाथ महाराजांच्या कथेसाठी उपस्थित असलेल्या भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते.


यावेळी भाऊसाहेब महाराज झुरळे या ,देवस्थानचे भगत संतोष झुरळे,,योगेश मुळे,अर्जुन पत्रकार दत्तात्रय घोलप नवनाथ मुळे,भाऊसाहेब काळे,सतीश मुळे,सोमनाथ ढवळे,बबन काळे, दर्शन झुरुळे,आदींसह गावातील गायक,वादक महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर तालुक्यासह आसपासच्या परिसराचे एक जागृत देवस्थान म्हणून काकडवाडीचे महालक्ष्मी देवस्थान ओळखले जाते या देवीच्या दर्शनासाठी मी नित्यनेमाने येत असतो. ज्यावेळी मी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेत होतो तेव्हा तेथेच मला विधान सभेची उमेदवारी जाहीर झाली असल्याचे समजले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. अन तिच्या कृपाआशीर्वादानेच या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली आहे. भविष्यात या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शक्ती देवो अशी प्रार्थना महालक्ष्मी मातेच्या चरणी केली आहे.

या महालक्ष्मीमातेने माझ्यावर कृपा आशीर्वाद ठेवला तसाच कृपाशीर्वाद या सर्वभाविक भक्तांवर ठेवावा. त्यांना सुख-समृद्धी आणि आरोग्यसंपदा लाभू दे आणि या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची मला शक्ती देवो अशी प्रार्थना महालक्ष्मीच्या चरणी केली असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, याच महालक्ष्मी मातेच्या मंदिरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी या तळेगाव आणि निमोण भागातील जनतेला आपण पाणी देणारच हा शब्द दिला होता. तो पाण्याचा प्रश्न जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा दिलेला शब्द पूर्ण होत आहे याचा मला आनंद होत आहे. या भोजापुर चारीचे पाणी सर्वच गावांना समान प्रमाणात कसे मिळेल याबाबत आपण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मातेच्या मंदिरात खास नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस गिरी महाराज यांच्या वाणीतून नवनाथ कथा श्रवण करण्याचे पुण्य या परिसरातील भावी भक्तांना मिळाले आहे. या कथेच्या माध्यमातून नक्कीच परिसरातील भाविक भक्तांना ऊर्जा मिळत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील नवसाला पावणारे काकडवाडी येथील महालक्ष्मीमातेचे मंदिर आहे. महालक्ष्मी मातेच्या कृपाशीर्वादाने अनेक भाविक भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आहेत. तुम्ही सर्वप्रथम या महालक्ष्मीमातेच्या दर्शनासाठी आले तेव्हा तुम्हाला उमेदवारी मिळाली. दुसऱ्यांदा दर्शनाला आले तेव्हा तालुक्याचे आमदार म्हणून आले आणि आता तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही दर्शनासाठी याल तेव्हा मंत्री म्हणूनच यावा आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महालक्ष्मी माता नक्कीच पूर्ण करेल.
– श्री भाऊसाहे महाराज झुरळे
अध्यक्ष महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट काकडवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here