ठेकेदारच विरोधकांच्या मोर्चात सहभागी होऊन येतात; कामात हलगर्जीपणा करणार्‍या ठेकेदारांवर कडक कारवाई करा

0
98

संगमनेर : नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत शहरातील दिल्ली नाका परिसरात सर्व्हिस रोड तयार करणे व काँक्रिट गटार सुधारणा करणे या विकास कामांचे भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात नगरपरिषदेवर कॉंग्रेसने काढलेल्या मोर्चावर आमदार अमोल खताळ यांनी जोरदार टीका केली.

त्याच झाल अस की, गेल्या काही दिवसांपूर्वी माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी नगरपरिषदेवर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. यामध्ये प्रामुख्याने शहरातील वाढती अस्वच्छता हा मुद्दा होता. यावर बोलताना आमदार खताळ म्हणाले, मागील दहा पंधरा वर्षांपासून कचर्‍याचा ठेकेदार कोण आहे? गटार स्वच्छ करण्याचा ठेकेदार कोण आहे? हेच ठेकेदार आहेत जे यांच्या मोर्चात सहभागी होऊन येतात आणि निवेदन देतात.

यावेळी आमदार खताळ बोलताना पुढे म्हणाले, कचरा आणि गटार साफ होत नाहीत याबाबत कडक कारवाई झाली पाहिजे. तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम घेणारे ठेकेदार काम करत नसतील तर त्याच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना नगरपरिषदेच्या प्रशासकीय मुख्य अधिकार्‍यांना आमदार अमोल खताळ यांनी दिल्या आहेत.

नगरविकास खात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे शहरातील सर्व समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेच्या प्रशासकीय मुख्य अधिकार्‍यांना पूर्ण सहकार्य केले जाणार आहे. शहरातील सार्वजनीक प्रश्नांवर जबाबदार ठेकेदार आणि संबंधित लोकांवर कडक कारवाई करावी. याबाबत अधिकार्‍यांना उघड सूचना देताना आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान, संगमनेर शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, पायाभूत सुविधा अत्यंत आवश्यक आहेत. त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणार असल्याचा शब्द आमदार खताळ यांनी दिला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here