संगमनेरात युवाशक्ती भगव्याखाली एकवटत आहे याचा अभिमान : आ. खताळ

0
110

संगमनेर (प्रतिनिधी)-संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे. तालुक्यात युवाशक्ती भगव्या खाली एकवटत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार अमोलखताळ यांनी केले. संगमनेर येथे नुकतीच शिवसेनेची युवक निर्धार बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शशिकांत दायमा, अजित भारते, अनिरुद्ध वालझाडे, ओंकार शिंदे, ओंकार जंगम, विजय वालझाडे, अजय वालझाडे, आदित्य जोर्वेकर, सौरभ वाकचौरे, रोहितभारती, मोहिज अत्तार, अक्षय संस्कर, शुभम क्षत्रिय यांच्यासह अन्य ५० ते ६० युवक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत भगवा हातात घेतला आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आ. खताळ पुढे म्हणाले येथून पुढील काळातही अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहे. लवकरच शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर येथे कार्यक्रम होणार असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here